आशा स्वयंसेविकांनी दिले धरणे
By Admin | Updated: January 13, 2015 01:24 IST2015-01-13T01:24:21+5:302015-01-13T01:24:21+5:30
नियमित मानधन लागू करण्याची मागणी.

आशा स्वयंसेविकांनी दिले धरणे
अकोला : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांना नियमित मानधन लागू करून, सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी क्रांती आशा विकास फाऊंडेशन संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या आरोग्य विभागाचे उपक्रम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम आशा स्वयंसेविका करीत आहेत. ग्रामीण भागात काम करीत असताना, आशा स्वयंसेविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना कामाचा मोबदला अल्प प्रमाणात मिळत असून, तोदेखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे नियमित मानधन लागू करण्यात यावे, दरवर्षी गणवेश देण्यात यावा, एसटी बसमध्ये मोफत प्रवास मिळावा, अंगणवाडी सेविकांप्रमाणे सोयी-सवलती लागू करण्यात याव्या व इतर मागण्यांसाठी क्रांती आशा विकास फाऊंडेशनच्या नेतृत्वात अंगणवाडीसेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले.