पश्चिम व-हाडातही हुडहूडी!
By Admin | Updated: December 20, 2014 00:05 IST2014-12-20T00:05:34+5:302014-12-20T00:05:34+5:30
अकोला येथे शुक्रवारी ७.७ अंश सेल्सियस.

पश्चिम व-हाडातही हुडहूडी!
अकोला : गत काही दिवसापासून पश्चिम वर्हाडात थंडीची लाट पसरली आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तिन्ही जिल्ह्यांचा पारा झपाट्याने घसरत असून, त्याचा परिणाम जनजिवनावर होत आहे.
अकोला जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरतच आहे. शुक्रवारी येथे ७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात १२ डिसेंबरपर्यंत किमान तापमानाची नोंद १९ अंशापर्यत होती. १३ आणि १४ डिसेंबर रोजी १६ अंश नोंद करण्यात आली. १५ डिसेंबरपासून जिल्ह्यातील तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला असून, तो अद्याप कायम आहे.
वाशिम जिल्ह्यात १५ डिसेंबर रोजी १६.४, १६ डिसेंबर रोजी १४.८, १७ डिसेंबर रोजी १४.६, तर १८ डिसेंबर रोजी १२ किमान तापमान अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले.