देशसेवा करून घरी परतणाऱ्या सैनिकाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:32 IST2021-02-06T04:32:42+5:302021-02-06T04:32:42+5:30

३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या आगमनानिमित्त टीकेव्ही चौकात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १७ वर्षे देशसेवा करून परतणारे सैनिक दीपक ...

Honoring a soldier returning home after serving the country | देशसेवा करून घरी परतणाऱ्या सैनिकाचा सन्मान

देशसेवा करून घरी परतणाऱ्या सैनिकाचा सन्मान

३ फेब्रुवारी रोजी त्यांच्या आगमनानिमित्त टीकेव्ही चौकात सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १७ वर्षे देशसेवा करून परतणारे सैनिक दीपक गाडगे यांचा सन्मान करण्यात आला. सत्काराच्या कार्यक्रमानंतर सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. माजी सैनिक विजय जाधव यांनी देशभक्ती बिगुल जागोजागी वाजवून देशभक्तीचे वातावरण तयार केले होते. मिरवणुकीदरम्यान तिरंगी झेंडा घेत ‘भारत माता की जय’चा जयघोष करण्यात आला. या मिरवणुकीदरम्यान सैनिकाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला माजी सैनिक संघटनेचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी माजी सैनिक संघटनेचे तुकाराम निलखन, देवीदास निमकडे, प्रशांत निलखन, अंबादास टप्पे, रवींद्र श्रीनाथ, डिगांबर गाडगे, विजय जाधव, श्याम देवकर, धम्मपाल कांबळे, अशोक कोथळकर, अरुण राऊत, अरविंद गवळी, सैनिक पिता देवानंद गाडगे, अशोक गाडगे, भोजू बायस पहेलवान, जगदीश निंबोळे, नगरपालिकेचे सभापती राजू उगले, पातूर पंचायत समितीचे माजी सभापती बालू बगाडे, मंगेश गाडगे, जगदीश निंबोळे, गणेश गाडगे, कैलास बगाडे, उमेश निलखन आदी उपस्थित होते. (फोटो)

Web Title: Honoring a soldier returning home after serving the country