मधापुरी येथे शहीद सैनिकाच्या कुटुंबाचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST2021-02-05T06:12:37+5:302021-02-05T06:12:37+5:30

मधापुरी येथील शहीद जवान प्रल्हाद भोलाजी साव यांना १९६२ साली भारत व चीनच्या युद्धात वीरमरण प्राप्त झाले होते. शहीद ...

Honoring the family of the martyred soldier at Madhapuri | मधापुरी येथे शहीद सैनिकाच्या कुटुंबाचा सन्मान

मधापुरी येथे शहीद सैनिकाच्या कुटुंबाचा सन्मान

मधापुरी येथील शहीद जवान प्रल्हाद भोलाजी साव यांना १९६२ साली भारत व चीनच्या युद्धात वीरमरण प्राप्त झाले होते. शहीद जवानांच्या कुटुंबाचे मनोधैर्य वाढविण्यासाठी व त्याच्या कुटुंबीयांना निर्माण झालेल्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री बच्चू कडू यांनी शहीद जवान कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी शहीद जवान प्रल्हाद साव यांच्या प्रतिमेला पालकमंत्री बच्चू कडू यांनी हारार्पण करून कुटुंबाचा सन्मान केला व त्यांच्या समस्या निकाली काढण्याचे निर्देश त्वरित प्रशासकीय यंत्रणेला दिले.

यावेळी मूर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, निवासी तहसीलदार राजीव डाबेराव, गटविकास अधिकारी बाळासाहेब बायस, मधापुरी सरपंच प्रदीप ठाकरे, माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे, डॉ.विजय भटकर पुरस्कृत उन्नत भारत अभियान समन्वयक अमर ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष उमेश ठाकरे, रूपेश कडू, रवींद्र मोहिते उपस्थित होते.

नवनिवार्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार

कुरूम : नुकत्याच झालेल्या कुरूम ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास परिवर्तन पॅनलच्या १३ सदस्यांनी यश प्राप्त केले. या नवनिर्वाचित सदस्यांनी २६ जानेवारी रोजी पालकमंत्री बच्चू कडू यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी बाबूभाऊ देशमुख, राहुल राठी, संतोष शिरभाते, जफर खान नवाब, दिलीप देशमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Honoring the family of the martyred soldier at Madhapuri