तलाठय़ांवर प्राणघातक हल्ला!

By Admin | Updated: January 16, 2017 01:26 IST2017-01-16T01:26:09+5:302017-01-16T01:26:09+5:30

अवैध गौण खनिज ट्रॅक्टरची चौकशी केली असता केला हल्ला; गुन्हा दाखल

Holocaust attacks! | तलाठय़ांवर प्राणघातक हल्ला!

तलाठय़ांवर प्राणघातक हल्ला!

धनज बु. (वाशिम),दि. १५ : शासकीय कामात अडथळा निर्माण करून दोन तलाठय़ांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी श्रावण अमोल वडलावे याच्याविरूद्ध १५ जानेवारीला विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. वाढोणा ते तारखेडा रोडवर मारोती शेंडे यांच्या शेताजवळून विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून बेकायदेशीर डब्बर व मुरूमाची वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. ट्रॅक्टर चालक अमोल वडलावे यास परवाना मागितला असता, त्याने तलाठी बबन किसन भारती व रविंद्र गजानन कोरडे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कोरडे यांना जबर मार लागला आहे. यानंतर अमोल वडलावे याने त्याचे नातेवाईक प्रविण ज्ञानोबा वडलावे, जयराम ज्ञानोबा वडलावे यांना फोन लावून घटनास्थळी बोलावून घेतले. या लोकांनी देखील दोन्ही तलाठय़ांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी तलाठी भारती यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी व मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर कलम ३0७, ३५३, ३७९, ५0४, १८६, ३४ भादंविनुसार गुन्ह्याची नोंद केली. याबाबत पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल गुहे करित आहेत.

Web Title: Holocaust attacks!