कोरोनाच्या सावटामुळे यंदाही होळी 'बेरंग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:46+5:302021-03-26T04:18:46+5:30
येत्या २८-२९ तारखेला होळी आहे.मात्र यंदा कोरोनामुळे रंगाचा बेरंग होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी देखील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने डोके वर ...

कोरोनाच्या सावटामुळे यंदाही होळी 'बेरंग'
येत्या २८-२९ तारखेला होळी आहे.मात्र यंदा कोरोनामुळे रंगाचा बेरंग होण्याची चिन्हे आहेत.
यावर्षी देखील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने डोके वर काढत सर्वत्र हाहाकार माजविला आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यापासूनच प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. कोरोनामुळे संक्रात,प्रजासत्ताक दिन,छत्रपती शिवाजी महाराज जयंती,महाशिवरात्रीसह इतर उत्सवादरम्यान कार्यक्रमांना ब्रेक लागला. कोरोना संक्रमण पाहिजे त्याप्रमाणात अज्ञापही कमी झाले नाही.त्यामुळे होळीच्या दरम्यान मोठी सावधगिरी बाडगण्याची गरज निर्माण झाली आहे.होळी रंगपंचमी जवळ येत असतांना त्याचा उत्साह बाजारातही दिसून येत नाही.व्यापाऱ्यांकडून प्रकारची रंग खरेदी विषयी हालचाल दिसत नाही.कोरोनामुळे होळी खेडणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. नियमांचे उल्लंघन करून होळी खेळणे खूप धोकादायक ठरू शकते. एकमेकांना रंग लावल्याने संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो. गेल्यावर्षी सर्वच सण साधेपणाने साजरे केले.त्यामुळे आता होळी सुद्धा साधेपणाने साजरी करावी लागणार आहे. होळीच्या उत्साहावर विरजण पडणार असून होळीचा रंग बेरंग होताना दिसत आहे.