मालवाहूची-प्रवासी वाहनाला धडक; तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:16 IST2021-01-17T04:16:40+5:302021-01-17T04:16:40+5:30

पातूर: अकोला-पातूर मार्गावर चिखलगावनजीक मालवाहूने प्रवासी वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. ...

Hit a freight-passenger vehicle; Three killed | मालवाहूची-प्रवासी वाहनाला धडक; तीन ठार

मालवाहूची-प्रवासी वाहनाला धडक; तीन ठार

पातूर: अकोला-पातूर मार्गावर चिखलगावनजीक मालवाहूने प्रवासी वाहनास जोरदार धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना शनिवार, दि. १६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. तीनही मृतक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आहेत. चालक संजय निवृत्ती राऊत (४५) (रा.मुंगळा, ता. मालेगाव जि. वाशिम), लक्ष्मी रामभाऊ वंजारे (६५), बाळू बळीराम कुऱ्हे (३५) (दोन्ही राहणार कळंबेश्वर ता. मालेगाव, जि. वाशिम) अशी मृतांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, अकोला-पातूर मार्गाने प्रवासी वाहन क्र.(एमएच ३७ ५३८१) प्रवासी घेऊन पातूरकडे येत होते. विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक (एमएच३० एल २९९६)ने जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, प्रवाशी वाहनाचा अक्षरश: चुराडा झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तसेच चार जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमीमध्ये गायत्री ज्ञानेश्वर वंजारे या ३ वर्षीय चिमुकलीचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच चिखलगाववासीयांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी रवाना करण्यासाठी मदत केली. अपघातामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती होताच पातूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. त्यानंतर, वाहतूक सुरळीत झाली.

Web Title: Hit a freight-passenger vehicle; Three killed