शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

ऐतिहासिक रथोत्सवाने फेडले डोळ्याचे पारणे

By admin | Published: November 08, 2014 11:40 PM

बुलडाणा जिल्ह्यातील सोनाळा येथे संत सोनाजी महाराज महोत्सवाची सांगता.

चंद्रप्रकाश कडू / सोनाळा (बुलडाणा) संत सोनाजींच्या नावाचा जयजयकार करीत मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सोनाजी महाराजांच्या रथयात्रा महोत्सवाची सांगता दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांनी महाप्रसाद व दर्शनाचा लाभ घेतला. श्री संत सोनाजी महाराजांच्या यात्रा महोत्सवाचा ३१ ऑक्टोबरला प्रारंभ झाला होता. आज, शनिवार ८ नोव्हेंबर रोजी महाराजांच्या रथाच्या परिक्रमेने व दहीहांडीने सांगता करण्यात आली. हभप मधुकर महाराज साबळे पळसखेडकर यांचे कीर्तन होऊन १२ वाजता संत सोनाजी महाराजांच्या प्राचीन तीन मजली भव्य लाकडी रथाची पूजा करण्यात आली. हजारो हातांनी हार, झेंडुची फुले व नारळांनी महाराजांचा रथ सजविला होता. हा रथ दोरखंडाच्या साह्याने वाजतगाजत टाळमृदंग व फटाक्यांच्या आतषबाजीत प्रकाशबाबा मंदिराजवळ नेण्यात आला. यामध्ये सांप्रदायिक असंख्य भजनी दिंड्यांनी भाग घेतला होता. रथाची भक्तीभावाने पूजाअर्चा करुन रात्री १२ वाजता निघालेला रथ प्रकाश बाबांच्या मंदिरासमोर पोहोचला.तद्नंतर ८ नोव्हेंबरला सकाळी प्रकाशबाबांच्या मंदिरासमोरून महाराजांच्या रथाला हलविण्यात आले. दुपारी १२ वाजता रथ नियोजित स्थळी पोहोचला. १२ वाजता श्री संत सोनाजी महाराज मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेला होता. संत सोनाजी महाराज यात्रा महोत्सवाच्या निमित्त संत नगरी सोनाळा येथे आलेल्या परिसरातील तसेच राज्यभरातील लाखो भाविकांनी महाप्रसाद घेतला. ज्वारीची भाकरी, उडीदाची दाळ, अंबाडीची भाजी असे महाप्रसादाचे स्वरूप असते. १११ पोते ज्वारीच्या महाप्रसादाची परंपरा आजही मागील ३00 वर्षांपासून सुरु आहे. महाप्रसादाला दुपारी १ वाजता सुरुवात होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंंत हा महाप्रसाद सुरु होता. महाप्रसाद वितरण सुरळीत होण्यासाठी दरवर्षीप्रमाणे रामदास पांडव गुरुजी यांनी संचालन केले.