अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग; आरोपीस अटक

By Admin | Updated: November 4, 2016 02:29 IST2016-11-04T02:29:28+5:302016-11-04T02:29:28+5:30

आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

Highly-abled teenager; The accused arrested | अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग; आरोपीस अटक

अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग; आरोपीस अटक

बोरगाव मंजू, दि. ३- अल्पवयीन तरुणीस लग्नाचे आमिष देऊन तिच्यावर अतिप्रसंग केल्याची घटना सदर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून उघड झाली. या प्रकरणातील आरोपीला बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, करतवाडी येथील प्रदीप किरडे याने तिला लग्नाचे आमिष देऊन पळून नेले. बुधवारी रात्री जबरी अतिप्रसंग केला व त्याचा साथीदार पुरुषोत्तम कराडे रा. लाखोडा याने प्रदीप यास सहकार्य केले, अशी फिर्याद सदर युवतीने बोरगाव पोलिसांत बुधवारी रात्री दिली. ठाणेदार पी. के. काटकर, पीएसआय अशोक पितळे, विकास बकावार व सचेंद्र पंचवटकर यांनी सदर युवतीच्या फिर्यादीवरून प्रदीप किरडे व त्याला सहकार्य करणारा पुरुषोत्तम कराडे या दोघांविरुद्ध कलम ३७६, ३६३, ३६६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Highly-abled teenager; The accused arrested