शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात हेपेटाइटिस ‘बी’चे २००,‘सी’चे ८४ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 12:37 IST

राज्यातील हजारो रुग्णांना हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

- प्रवीण खेते लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : रक्तपेढ्यांमधील संकलित रक्ताच्या चाचण्यांमध्ये राज्यातील हजारो रुग्णांना हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे दोन्ही आजार सुप्त असल्याने हेपेटाइटिसची लागण झाल्याचे रुग्णांना कळत नाही. त्यामुळे त्याचा धोकाही वाढला आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत राज्यभरातील रक्तपेढ्यांकडून हेपेटायइटिस ‘बी’ व ‘सी’च्या रुग्णांची माहिती संकलित करण्यात येत आहे.हेपेटाइटिस बी आणि सी हे दोन्ही आजार सुप्त असल्याने रुग्णांना सहज लक्षात येत नाहीत. कावीळ झाला तरच तपासणी करून या आजाराची चाचणी केल्या जाते; परंतु रक्तपेढ्यांमधील संकलित रक्ताच्या तपासणीमध्ये शंभरातून दोन ते तीन जणांना हा आजार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ज्या रक्त नमुन्यांमध्ये हा आजार आढळला, ते रक्त रक्तपेढ्यांकडून नष्ट करण्यात येत होते. शिवाय, यासंदर्भात संबंधित रुग्ण किंवा आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत नव्हते.त्यामुळे या दोन्ही आजारांचा झपाट्याने प्रसार होत आहे. यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागातर्फे स्वतंत्र सेल तयार करण्यात आला असून, राज्यभरातील सर्वच रक्तपेढ्यांकडून अशा रुग्णांची माहिती मागविण्यासंदर्भात राज्याचे आरोग्य सेवा आयुक्तांनी गत आठवड्यात ‘व्हिडिओ कॉफरन्सी’द्वारे राज्यभरातील सर्वच जिल्हा शल्य चिकित्सक व इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार राज्यभरातील रक्तपेढ्यांकडून अशा रुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडून संकलित केली जात आहे.असे असेल स्वतंत्र सेलचे कार्यरक्तपेढ्या व एड्स नियंत्रण कक्षातून रुग्णांची माहिती संकलित करणे.रुग्णांशी संपर्क करून त्यांचे समुपदेशन करणे.‘एचएलएल’ कंपनीमार्फत हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’चा ‘व्हायरल लोड’ तपासणे.तपासणी अहवालानुसार एनसीडी सेंटर अंतर्गत रुग्णांवर उपचार करणे.हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’चा धोका वाढाला!रक्तपेढ्यांकडून मागविण्यात आलेल्या माहितीनुसार, गत एक-दीड वर्षात अकोल्यात हेपेटाइटिस ‘बी’चे २००, तर हेपेटाइटिस ‘सी’चे ८४ रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यामुळे या रुग्णांना आतापर्यंत उपचारच न मिळाल्याने त्यांच्यापासून इतरांनाही हा आजार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

राज्य आरोग्य सेवा आयुक्तांच्या निर्देशानुसार रक्तपेढ्यांकडून हेपेटाइटिस ‘बी’ व ‘सी’च्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात येत आहे. या रुग्णांचे समुपदेशन, वैद्यकीय तपासणी व उपचार करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र सेलची निर्मिती करण्यात आली आहे.- डॉ. राजकुमार चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाHealthआरोग्यBlood Bankरक्तपेढी