अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिला मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:14 IST2021-01-10T04:14:35+5:302021-01-10T04:14:35+5:30
चान्नी : पातूर तालुक्यातील चान्नी येथील झोपडपट्टी दीवानी येथील अपघातग्रस्त कुटुंबीयांना दहा रुपयांचा धनादेश देऊन आमदार नितीन देशमुख यांनी ...

अपघातग्रस्त कुटुंबीयांना दिला मदतीचा हात
चान्नी : पातूर तालुक्यातील चान्नी येथील झोपडपट्टी दीवानी येथील अपघातग्रस्त कुटुंबीयांना दहा रुपयांचा धनादेश देऊन आमदार नितीन देशमुख यांनी मदतीचा हात दिला आहे. येथील कुटुंबीय लग्नासाठी ३ जाानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंभुर्णी येथे गेले हाेते. दरम्यान, भरधाव वाहनाने वऱ्हाड्यांना धडक मारल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृत गजानन किसन ताले व अमोल श्यामराव वाट यांच्या घरी भेट देऊन प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत आमदार नितीन देशमुख यांनी दिली. यावेळी संतोष ताले, देवमन चराटे, जि. प. सदस्य पंजाबराव पवार, ॲड. झडपे, पंडितराव देशमुख, वासुदेव पाटील, वसंत ताले, चंद्रकांत ताले, पं. स. सदस्य अनिल इंगळे, सचिन वानखडे, सचिन राखोंडे, दीपक ताले, विलास इंगळे, मोहन सोनोने, दत्ता तायडे, संतोष इंगळे, गजानन येरकर, चंदन जैन उपस्थित हाेते.