रद्दीतून शिक्षणासाठी मदत

By Admin | Updated: July 17, 2017 14:07 IST2017-07-17T14:07:38+5:302017-07-17T14:07:38+5:30

गरजू विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरण्याचा नवा उपक्रम नुकताच राबविला.

Help for the disruption of education | रद्दीतून शिक्षणासाठी मदत

रद्दीतून शिक्षणासाठी मदत

अकोला -  महापस्ती अभियान अंतर्गत अर्हम युवा सेवा समूहाच्या बच्चे कंपनीने आपापल्या घरातील दोन महिन्याची रद्दी एकत्र केली.या एकत्र झालेल्या ४६१० किलो रद्दीची विक्री करून जमा झालेल्या पैशात आपल्या जवळील पाच हजार रुपये जोडून या पैशातून कोचिंग क्लास च्या गरजू विद्यार्थ्यांची ट्युशन फी भरण्याचा नवा उपक्रम नुकताच राबविला.तसेच नागपूरच्या दुर्गा माता भक्त मंडळ च्या सहकार्याने चौपन्न हजार रुपयांची शिष्यवृत्ती या ट्युशनच्या विध्यार्थ्यांना देण्यात आली.
अर्हमच्या बच्चे कंपनीने तुलसीदास गोयंका यांच्या सहकार्याने दहावीच्या सात,अकरावीच्या एक व बीकॉम च्या तीन गरजू व गरीब विध्यार्थ्यांना तब्बल नव्वद रजिस्टरबुक प्रदान केलीत. दरम्यान बच्चे कंपनीने आनंद आश्रम ला भेट देऊन तेथील तीस विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित केले.राष्ट्रसंत पु. गुरुदेव नम्रमूनी म.सा.यांच्या विचारांचा प्रसार सहकार्याच्या माध्यमाने अर्हम ची बच्चे कंपनी तन -मन -धनाने करीत आहे.  

Web Title: Help for the disruption of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.