घर कोसळलेल्या कुटूंबाला प्रशासनाकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:19 IST2021-03-27T04:19:28+5:302021-03-27T04:19:28+5:30

तालुक्यातील खामखेडा गावातील नरेंद्र बंडोजी घायवट यांचे घर कोसळले होते. यामध्ये टीनपत्रे व घरातील धान्याचे नुकसान झाले होते. घराची ...

Help from the administration to the family whose house collapsed | घर कोसळलेल्या कुटूंबाला प्रशासनाकडून मदत

घर कोसळलेल्या कुटूंबाला प्रशासनाकडून मदत

तालुक्यातील खामखेडा गावातील नरेंद्र बंडोजी घायवट यांचे घर कोसळले होते. यामध्ये टीनपत्रे व घरातील धान्याचे नुकसान झाले होते. घराची भिंत जमीनदोस्त झाली होती. घायवट यांना प्रशासनाकडून पाच हजार रूपयांची मदत देण्यात आली. शुक्रवारी तहसीलदार दीपक बाजड यांनी घायवट यांना धनादेश दिला.

नरेंद्र घायवट यांचे घर कोसळल्यामुळे त्यांनी जवळच असलेल्या शेतामध्ये आश्रय घेतला होता. या अपघात घायवट कुटूंब थोडक्यात बचावले. घटनेची माहिती तलाठी महादेव नाईक यांना मिळताच, त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन कुटुंबाला भेट दिली. प्रशासनाला याबाबतची सूचना करून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

त्यानुसार पातुरचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या हस्ते शुक्रवारी पाच हजार रुपयांचा धनादेश नरेंद्र घायवट यांना देण्यात आला.

फोटो:

Web Title: Help from the administration to the family whose house collapsed