उमेदवारीसाठी अर्धा डझन पक्षांमध्ये चढाओढ
By Admin | Updated: September 7, 2014 01:42 IST2014-09-07T01:42:15+5:302014-09-07T01:42:15+5:30
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच.

उमेदवारीसाठी अर्धा डझन पक्षांमध्ये चढाओढ
विवेक चांदूरकर / अकोला
जिल्ह्यात सध्या बाळापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासाठी जवळपास अर्धा डझन राजकीय पक्षांमधील इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. अन्य विधानसभा मतदासंघात जेवढे उमेदवार उमेदवारी मागत आहेत, त्यापेक्षा जास्त पक्ष बाळा पूर विधानसभा मतदासंघ त्यांच्यासाठी सोडण्याची मागणी करीत आहेत. शिवसंग्राम, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध पक्षाच्या डझनभर नेत्यांनी येथून उमेदवारी मागितली आहे. अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी सर्वात जास्त नेत्यांची पसं ती ही बाळापूर विधानसभा मतदासंघालाच आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम पक्षाने बाळापूर मतदारसंघ मागितला आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही बाळापूर मतदारसंघ मागितला आहे. भाजपच्या वाट्यावर आलेल्या बाळापूर मतदारसंघावर शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांना दावा केला आहे. तसेच आघाडीतील कॉँग्रेसकडे असलेल्या हा म तदारसंघ मिळावा यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे सर्वच पक्षाची बाळापूर मतदारसंघ मिळविण्यासाठी होड लागली आहे. बाळापूर मतदारसंघाचे सध्याचे आमदार भारिपचे बळीराम सिरस्कार आहेत. एखाद्या म तदारसंघात आपल्याच पक्षाचा विद्यमान आमदार असला तर त्याची तिकीट कापणे व उमेदवारी मागणे कठीण असते. मात्र, अन्य पक्षाचा आमदार असला तर उमेदवारीवर दावा करणे सहज सोपे असते. सेना-भाजप व काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांना बाळापूरमध्ये ही संधी मिळाली आहे. त्यातच शिवसंग्राम व स्वाभिमानीची भर पडली आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष बाळापूर विधानसभा मतदासंघाकडे लागले आहे. गत निवडणुकीत हा मतदारसंघ यु तीतून भाजपच्या तर आघाडीतून काँग्रेसच्या वाट्याला गेला होता. मात्र या ठिकाणी दोन्ही पक्षाचा उमेदवार पडल्याने सेना व राष्ट्रवादीनेही या मतदारसंघावर दावा केला आहे. जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी मूर्तिजापूर अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे.