तुकाराम चौकातील रास गरब्याला प्रचंड प्रतिसाद

By Admin | Updated: October 9, 2016 02:52 IST2016-10-09T02:52:39+5:302016-10-09T02:52:39+5:30

गत १0 वर्षांपासून नवदुर्गोत्सव साजरा; ५१ फुटी रावण दहनाचेही आयोजन.

Heavy response to Tukaram Chowk's Ras Garbagh | तुकाराम चौकातील रास गरब्याला प्रचंड प्रतिसाद

तुकाराम चौकातील रास गरब्याला प्रचंड प्रतिसाद

अकोला, दि. 0८- तुकाराम चौक येथे शिव हेल्थ क्लब यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रास गरब्याला युवक-युवतींचा प्रचंड प्रतिसाद आहे. युवक आणि युवतींना गरबा खेळण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळी सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, शहरातील सर्वात मोठा गरबा रास या ठिकाणी होत असल्याची माहिती आहे.
संत तुकाराम चौक येथे शिव हेल्थ क्लबच्यावतीने गत १0 वर्षांपासून नवदुर्गोत्सव साजरा करण्यात येत असून, यावर्षी सर्वात मोठा रास गरबा या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. नवदुर्गेची स्थापना यासोबतच आनंद मेला आणि ५१ फुटी रावण दहनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले असून, एकाच ठिकाणी एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम साजरे करण्यात येत असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. तुकाराम चौक येथे यावर्षी कोल्हापूरची महालक्ष्मी स्थापन करण्यात आली असून, मोठी सजावट या ठिकाणी करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर साकारण्याचा प्रयत्न शिव हेल्थ क्लबद्वारे करण्यात आला आहे. या देवीजवळ रास गरब्याला मोठी गर्दी होत असून, युवतींना सुरक्षितता असल्याने शहरातील बहुतांश युवती या ठिकाणी गरबा खेळण्यासाठी गर्दी करीत आहेत.

Web Title: Heavy response to Tukaram Chowk's Ras Garbagh