पांढुर्णा परिसरात मुसळधार पाऊस, शेतकरी आनंदित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:21+5:302021-06-25T04:15:21+5:30
पांढुर्णासह परिसरामध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय, ...

पांढुर्णा परिसरात मुसळधार पाऊस, शेतकरी आनंदित
पांढुर्णासह परिसरामध्ये पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने पुन्हा दुबार पेरणी करावी लागते की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला होता. मात्र पांढुर्णासह परिसराध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पांढुर्णा-पिंपळडोळी, सोनुना, चोंढी, अंधारसांगवी, नवेगाव, जांभ, उमरवाडी, चारमोळी, घोटमाळ, झरंडी गावामध्ये मुसळधार पाऊस पडल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.
शेतकऱ्यांनी शेतात डवरणीस सुरुवात केली आहे. दोन ते तीन दिवसांपासून शेतांमध्ये डवरणी कामास वेग आला आहे. पिकाला डवरणी देण्यास सुरुवात केली आहे
फोटो:
१० जून रोजी मुसळधार पाऊस झाल्यामुळे पेरणी केली होती. परंतु पावसाने दांडी मारल्यामुळे दुबार पेरणीचे संकट येणार होते. परंतु बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. - गजानन साहेबराव देवकते, शेतकरी
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली असल्याने, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येते की काय, अशी चिंता वाटत होती. परंतु बुधवारी झालेल्या पावसामुळे पिकांना चांगला आधार मिळाला.
- किशोर देवकते, शेतकरी