सातपुड्यात जोरदार पाऊस; मोहाळी नदीला पूर

By Admin | Updated: June 28, 2016 02:22 IST2016-06-28T02:22:36+5:302016-06-28T02:22:36+5:30

आकोट-तेल्हारा मार्ग काही काळासाठी बंद पडला होता.

Heavy rain in Satpuda; The flood of Mohali river | सातपुड्यात जोरदार पाऊस; मोहाळी नदीला पूर

सातपुड्यात जोरदार पाऊस; मोहाळी नदीला पूर

आकोट (जि. अकोला): सोमवारी सातपुड्याच्या पर्वतरांगेत झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टीने आकोट शहरानजीक वाहणार्‍या मोहाळी नदीला पूर आला. त्यामुळे काही काळ आकोट-तेल्हारा मार्ग बंद पडला होता. सातपुड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले. मोहाळी नदीच्या पुलावरून पाणी गेल्याने हा मार्ग बंद पडला होता. दरवर्षी हा मार्ग पावसाळ्यात बंद पडत असल्याने वाहतूक प्रभावित होते. कमी उंचीच्या असलेल्या या पुलाची उंची वाढविण्याकरिता दुर्लक्ष होत नागरिकांना पावसाळ्यात नाहक त्रास सहन करावा लागतो.

Web Title: Heavy rain in Satpuda; The flood of Mohali river