शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 18:36 IST

अनेक भागात वृक्ष कोसळून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीने उकाळ्यापासून मिळाला दिलासा

मनोज भिवगडे -

अकोला: शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल. वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की, अनेक भागातील वृक्ष उन्मळून पडले. त्यामुळे काही भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, पहिल्याच मान्सूनपूर्व पावसाने शहरात दाणादाण उडवली.

प्रचंड गर्मीने त्रस्त झालेल्या अकोलेकरांना गुरुवारी सायंकाळी आलेल्या मान्सून पूर्व पावसाने दिलासा मिळाला आहे. मात्र, अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत कडक ऊन पडले असताना अचानक ढग दाटून  येण्यास सुरुवात झाली. त्यानंतर साडेपाच वाजताच्या सुमारास सोसाटाच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला आणि बघता बघता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अर्धा तास पेक्षा अधिक वेळ कोसळलेल्या पावसाने शहरात सर्वत्र दाणादाण उडवली. बाजारपेठेत हातगाडीवर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या वस्तू पावसाने भिजल्या. शहरातील तोष्णीवाल लेआऊट परिसरात अकोला अर्बन बँक मुख्यालयाच्या समोरील मोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला. त्यामुळे या वृक्षाच्या खाली असलेल्या वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. शिवाय वृक्ष रस्त्यावरच पडल्यामुळे या मार्गावरची वाहतूकही बंद झाले होती. याशिवाय शहराच्या अनेक भागात झाडांच्या फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतूक बाधित झाली. शहराच्या काही भागात पाणी साचल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊस