पैशांची हाव लय भारी..!
By Admin | Updated: January 23, 2016 01:59 IST2016-01-23T01:59:37+5:302016-01-23T01:59:37+5:30
वर्षभरात लाचखोरांनी घेतली १४ लाखाची लाच!

पैशांची हाव लय भारी..!
नितीन गव्हाळे/अकोला: लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्गंत लाचखारोंविरूद्ध नेहमीच कारवाई केली जाते. भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी जनजागृतीही करण्यात येते; परंतु शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचार्यांची पैशांची हाव काही कमी होत नाही. गत वर्षभरामध्ये अमरावती विभागामध्ये १३६ लाचखोरांवर कारवाई करण्यात आली. या लाचखोरांनी जवळपास १४ लाख रूपयांची लाच स्विकारली होती. पैसा दिल्याशिवाय शासकीय कार्यालयात सामान्यांचे कामच होत नाही. दिवसागणिक वाढत असलेल्या या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाचखोरांविरूद्ध कारवाई केली जाते; नेहमी जनजागृतीही केली जाते; परंतु लाचखोर धडा घ्यायला तयार नाहीत. गत वर्षभरामध्ये अमरावती विभागात १३६ लाचखोरांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. या लाचखोरांनी १४ लाख १२ हजार ७९0 रूपयांची लाच घेतली. यामध्ये सर्वाधिक कारवाया अकोला जिल्हय़ात करण्यात आल्या. वर्षभरामध्ये ४0 लाचखोरांच्या मुसक्या आवळण्यात अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश मिळाले.