Heart surgery on 60 children under RBSK! | आरबीएसके अंतर्गत ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

आरबीएसके अंतर्गत ६० बालकांवर हृदय शस्त्रक्रिया!

अकोला : राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयविकाराशी लढा देणाऱ्या ९ बालरुग्णांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहे. शस्त्रक्रियेसाठी या बालरुग्णांना सोमवारी सर्वोपचार रुग्णालय येथून रवाना करण्यात आले. आतापर्यंत ६० बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्या असून, आणखी ११ बालरुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
‘आरबीएसके’ अंतर्गत दरवर्षी शेकडो बालकांची तपासणी करून, चिमुकल्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया केली जात आहे. या मोहिमेंतर्गत सर्वोपचार रुग्णालय येथे दीडशेपेक्षा जास्त बालकांची टू डी ईको तंत्रज्ञानाद्वारे तपासणी करण्यात आली होती. तपासणीच्या वैद्यकीय अहवालानंतर यातील ३१ बालकांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात सोमवार, १३ जानेवारी रोजी यातील १८ बालकांवर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली. दुसºया टप्प्यात सोमवार, २७ जानेवारी रोजी ९ बालकांना सर्वोपचार रुग्णालय परिसरातून मुंबईसाठी रवाना करण्यात आले. यावेळी डॉ. मधुकर राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून गाडी रवाना केली. या प्रसंगी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक नंदकिशोर कांबळे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत प्रत्येक शैक्षणिक सत्रात दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. विद्यार्थ्यांमध्ये आढळणाºया विविध आजारांचे निदान केले जात असले, तरी हृदयविकार आणि डोळ्यांच्या तिरळेपणाच्या उपचारावर जास्त भर दिला जातो.

Web Title: Heart surgery on 60 children under RBSK!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.