पोलीस कर्मचा-यास हृदयविकाराचा झटका

By Admin | Updated: April 3, 2017 02:43 IST2017-04-03T02:43:46+5:302017-04-03T02:43:46+5:30

बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

A heart attack in police personnel | पोलीस कर्मचा-यास हृदयविकाराचा झटका

पोलीस कर्मचा-यास हृदयविकाराचा झटका

अकोला, दि. २- बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी विलास बंकावार यांना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. बंकावार हे आपातापा बिट सांभाळत असून, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख आहे.
शहर पोलीस उपअधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या विशेष पथकात असताना विलास बंकावार यांनी अवैध धंदेवाल्यांवर कारवाईचा सपाटा लावला होता; मात्र जाधव यांची बदली झाल्यानंतर विलास बंकावार यांची अकोट फैल पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली. त्यानंतर बंकावार यांची बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली. या ठिकाणी आपातापा बिटचे काम करीत असताना त्यांना रविवारी अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना शहरातील एका मोठय़ा खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Web Title: A heart attack in police personnel