बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका
By Admin | Updated: April 15, 2015 02:01 IST2015-04-15T01:46:38+5:302015-04-15T02:01:20+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंदोबस्तात घडला प्रकार.

बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका
अकोला - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बंदोबस्तात असलेल्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रतन जावरकर यांना मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. या कर्मचार्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारीच हिवरखेडचे ठाणेदार अनंत पूर्णपात्रे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मंगळवारी आणखी एका पोलीस कर्मचार्यास हृदयविकाराचा झटका आल्याने पोलिसांवरील ताण-तणाव वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. जावरकर हे बंदोबस्तात व्यस्त होते. सायंकाळच्या सुमारास बंदोबस्तात असताना त्यांना अस्वस्थ वाटले. याबाबत त्यांनी सहकार्याला माहिती दिली. दोघांमध्ये चर्चा सुरू असतानाच रतन जावरकर यांच्या छातीमध्ये प्रचंड त्रास झाल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले.