चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:20+5:302021-02-05T06:15:20+5:30
---------------------------- ‘वंचित’चे पराग गवई समाजवीर पुरस्काराने सन्मानित अकोला: शिक्षण महर्षी, कृषी रत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाउसाहेब देशमुख यांच्या १२२ ...

चालत्या बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका
----------------------------
‘वंचित’चे पराग गवई समाजवीर पुरस्काराने सन्मानित
अकोला: शिक्षण महर्षी, कृषी रत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाउसाहेब देशमुख यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्ताने मराठा सेवा संघ, मराठा महासंघ, कुणबी समाज विकास मंडळ, देशमुख समाज सेवा मंडळ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, छावा संघटना, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ. भा. माळी महासंघ, बहुजन समन्वय सभा, महाराणा प्रताप प्रगतीशील मंडळ, विदर्भ कॅरम असोसिएशन, शिवाजी लोकविद्यापीठ, बहुजन पत्रकार संघ, भ्रष्टाचार विरोधी जनाअंदोलन न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक नेहरू पार्क येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता तथा रुग्णसेवक पराग रामकृष्ण गवई यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पराग गवई यांना रुग्ण सेवा तसेच विविध कार्याबद्दल समाजवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
----------------------------------------
महानगरात क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
अकोला: व्यापार, उद्योग व औद्यगिक विकासात चालना देण्यासाठी अभिनव उपक्रम राबविणाऱ्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीने महानगरात दि. ३० व ३१ जानेवारी असे दोन दिवसीय क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत दोन महिला क्रिकेट चमुसह तब्बल नऊ चमू सहभागी होणार असल्याची माहिती सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. देवेन अग्रवाल यांनी पत्रकार परिषेद दिली. यावेळी रिजनल हेड सुभाष गोरे, क्लब सचिव मुकेश मेर, कोषाध्यक्ष महेश मुंदडा उपस्थित होते.