शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावरील सुनावणी आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 01:40 IST

अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली सुनावणी शुक्रवारपर्यंंत पुढे ढकलण्यात आली आहे.

ठळक मुद्देआरोपींच्या वकिलांनी मागितला वेळ २0 कोटींचा भूखंड घोटाळा

अकोला : शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात मुख्य आरोपी असलेल्या दीपक झांबड व त्याचे पिता रमेश गजराज झांबड यांच्या अटकपूर्व नियमित जामीन अर्जावरील मंगळवारी असलेली सुनावणी शुक्रवारपर्यंंत पुढे ढकलण्यात आली आहे. आरोपींच्या वकिलांनी काही दस्तावेज सादर करण्यास वेळ मागितल्यानंतर न्यायालयाने त्यांना १0 नोव्हेंबरपर्यंंत वेळ दिली आहे.अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलिखित दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन हा भूखंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणले, तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आला. त्यांनी तपास पूर्ण करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड यांच्यासह भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब, आयटी अँक्ट कलम ६५ नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला असून, त्यांच्या नियमित जामीन अर्जावरील सुनावणी शुक्रवार, १0 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

घोटाळय़ातील महत्त्वाचे दस्तावेज हस्तगतआर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी तपासाला गती दिली असून, भूमी अभिलेख विभागातील तीन संगणकांच्या हार्ड डिस्क जप्त केल्या आहेत. त्यानंतर काही महत्त्वाचे दस्तावेज हस्तगत करण्यात आले असून, घोटाळय़ातील काही दस्तावेजांची तपासणी करण्यात येत आहे. या दस्तावेजांमधून झांबड यांच्याविरुद्ध महत्त्वाचे पुरावे प्राप्त झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक