भूखंड घोटाळय़ात झांबड पिता-पुत्र आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:47 AM2017-10-31T01:47:35+5:302017-10-31T01:48:58+5:30

अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात ‘तो मी नव्हेच!’ असे भासविणरा दीपक कृषी  सेवा केंद्राचा संचालक दीपक रमेश झांबड व त्यांचे पिता रमेश  गजराज झांबड या पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने सखोल त पास केल्यानंतर समोर आलेल्या सबळ पुराव्यावरून सोमवारी  मुख्य आरोपी केले आहे. 

The accused father and son accused of plot scam | भूखंड घोटाळय़ात झांबड पिता-पुत्र आरोपी

भूखंड घोटाळय़ात झांबड पिता-पुत्र आरोपी

Next
ठळक मुद्देआर्थिक गुन्हे शाखेने केला तपास दीपक व रमेश झांबडचा समावेश

प्रभाव लोकमतचा
सचिन राऊत । 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांच्या  भूखंड घोटाळय़ात ‘तो मी नव्हेच!’ असे भासविणरा दीपक कृषी  सेवा केंद्राचा संचालक दीपक रमेश झांबड व त्यांचे पिता रमेश  गजराज झांबड या पिता-पुत्रास आर्थिक गुन्हे शाखेने सखोल त पास केल्यानंतर समोर आलेल्या सबळ पुराव्यावरून सोमवारी  मुख्य आरोपी केले आहे. 
अकोला शहरातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं. १२१/१ व शिट  नं. ३७ बी १२१/१ अ हे संतोषी माता मंदिरानजीकचे भूखंड  शासनाच्या नावे आहेत. या भूखंडातील शिट नं. ३७ बी प्लॉट नं.  १२१/ ‘पैकी’ असा शब्दप्रयोग करून, तब्बल २0 कोटी रुपये  किमतीच्या ३ हजार ७१७.१७ चौरस मीटर भूखंडाचे हस्तलि िखत दस्तावेज नसताना तालुका भूमी अभिलेख विभागातील  अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने गजराज गुदडमल  मारवाडी यांच्या नावे संगणकात ऑनलाइन नोंद घेऊन, हा भू खंड कागदोपत्री हडपण्यात आला. हे प्रकरण ‘लोकमत’ने  चव्हाट्यावर आणले. तसेच पाठपुरावा केला. याप्रकरणी सिटी  कोतवाली पोलीस ठाण्यात अमर डिकाव यांनी तक्रार दिली; मात्र  काही दिवसांत तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे आल्यानंतर त्यांनी  तपास पूर्ण करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक योगेश  कुळकर्णी यांच्या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात  भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी-कर्मचारी व हा भूखंड हड प करणारा २0 कोटी रुपयांचा लाभार्थी यांच्याविरुद्ध भारतीय  दंड विधानाच्या कलम ४२0, ४६७, ४६८, ४७१, १२0 ब,  आयटी अँक्ट कलम ६५ नुसार गुन्हा दाखल केला होता. त्यानं तर आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख गणेश अणे यांनी सखोल तपास  केला असता, यामध्ये भूखंड ज्या गजराज गुदडमल  मारवाडीच्या (झांबड) नावावर आहे, तो घोटाळा करण्यासाठी  दीपक रमेश झांबड व रमेश गजराज झांबड या दोघांनी हा सर्व  कट रचल्याचे समोर आले. भूमी अभिलेख विभागातील काही  दस्तावेज व तपासणी तसेच काहींच्या बयानातून झांबड पिता- पुत्राने हा घोटाळा केल्याचे समोर येताच आर्थिक गुन्हे शाखेने या  दोघांनाही सदर प्रकरणात आरोपी केले आहे.

लोकमतच्या पाठपुराव्यानंतर झाली कारवाई
लोकमतने सदर प्रकरणाचा पर्दाफाश केल्यानंतर तीन  कर्मचार्‍यांना निलंबित केले. एका कर्मचार्‍याची विभागीय  चौकशी सुरू आहे, तर शिवाजी काळे यांच्यावर निलंबनाची  टांगती तलवार आहे. भूमी अभिलेख विभागाचे जिल्हा  अधीक्षक अजय कुळकर्णी व उपअधीक्षक योगेश कुळकर्णी  यांच्यावरही या प्रकरणात दिरंगाईचा ठपका ठेवण्यात आला  असून, दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांना भूखंड  घोटाळय़ात आरोपी करण्यात आले आहे.

जामीन अर्जावर सुनावणी ४ नोव्हेंबरला
शासनाच्या मालकीचा २0 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळय़ात  आरोपी असलेला दीपक झांबड व रमेश झांबड या दोघांनीही  अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतली  आहे. या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ४ नोव्हेंबर रोजी  सुनावणी ठेवण्यात आली असून, तत्पूर्वी आर्थिक गुन्हे शाखेचा  ‘से’ मागविण्यात आला आहे. हा ‘से’ दाखल झाल्यानंतर  झांबड पिता-पुत्राच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आणखी आरोपी येणार समोर
भूखंड घोटाळय़ात आणखी काही आरोपी समोर येणार  असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये  त्यावेळी निलंबित असलेल्या एका कर्मचार्‍याचा व त्याचा खास  साथीदार नगरसेविकेचा पती या दोघांचीही मुख्य भूमिका  असल्याचे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सदर प्रकरणात  भूमी अभिलेख विभागातील काही कर्मचार्‍यांसह भूखंड  घोटाळय़ात सहभागी असलेल्या आणखी काही जणांची नावे  समोर येणार आहेत.

Web Title: The accused father and son accused of plot scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.