अप्पर आयुक्त वरवंटकरच्या जामिनावर सुनावणी

By Admin | Updated: August 31, 2014 01:32 IST2014-08-31T01:31:14+5:302014-08-31T01:32:43+5:30

अकोला जिल्ह्यातील आश्रमशाळा जनरेटरखरेदी घोटाळा; आरोपी अप्पर आयुक्ताच्या जामिनावर सुनावणी.

Hearing on the appointment of Additional Commissioner Varvantikar | अप्पर आयुक्त वरवंटकरच्या जामिनावर सुनावणी

अप्पर आयुक्त वरवंटकरच्या जामिनावर सुनावणी

अकोला: आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी केलेल्या जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये ६७ लाख रुपयांचा अपहार करणारे एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे अमरावती येथील अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर यांच्या अटकपूर्व जामिनावर शनिवारी पांढरकवडा न्यायालयान सुनावणी झाली. त्यांच्या जामिनावर १ सप्टेंबर रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.
अकोला, धारणी व पांढरकवडा येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गंत जनरेटर खरेदी व्यवहारामध्ये अपहार झाल्याप्रकरणी धारणी व पांढरकवडा पोलिस ठाण्यांमध्ये आरोपी विश्‍वंभर वरवंटकर, महेंद्रसिंग खोजरे, जेएस एन्टरप्राईजेसचा मालक शब्बीर अली मो. अलिम आणि तत्कालीन एसडीओ महसूल कोकलकर यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटक टाळण्यासाठी स्थानिक न्यायालयांमध्ये अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.
महेंद्रसिंह खोजरे व शब्बीर अली यांचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला होता. त्यानंतर अप्पर आयुक्त विश्‍वंभर वरवंटकर याने पांढरकवडा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या जामिनावर शनिवारी सुनावणी झाली. निर्णय मात्र १ सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आता १ सप्टेंबर नंतरच वरवंटकर यांच्या भाग्याचा फैसला होणार आहे.

Web Title: Hearing on the appointment of Additional Commissioner Varvantikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.