Hearing of 37 Gram Panchayat members today! | ३७ ग्राम पंचायत सदस्यांची आज सुनावणी!

३७ ग्राम पंचायत सदस्यांची आज सुनावणी!

अकोला : ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर न करणाऱ्या अकोला तालुक्यातील ३७ ग्रामपंचायत सदस्यांची सोमवारी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षाच्या कालावधीत संबंधित तहसीलदारांकडे जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांना अपात्र ठरविण्याची तरतूद आहे.
त्यानुसार २०१७ मध्ये जिल्ह्यात घेण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागेवर निवडून आल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न करणाºया ग्रामपंचायत सदस्यांचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकाºयांना दिला होता. त्यानुषंगाने विहित कालावधीत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या अकोला तालुक्यातील ८५ ग्रामपंचायत सदस्यांपैकी ४८ सदस्यांची सुनावणी २८ सप्टेंबर रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. उर्वरित ३७ ग्रामपंचायत सदस्यांची सुनावणी सोमवार, ५ आॅक्टोबर रोजी अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात येणार आहे.

Web Title: Hearing of 37 Gram Panchayat members today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.