पंदेकृवि उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 01:43 IST2017-09-27T01:43:47+5:302017-09-27T01:43:53+5:30
अकोला: ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी कर्मचारी गत एक महिन्यापासून संपावर गेले असून, १६ दिवसांपासून कर्मचार्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.

पंदेकृवि उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावली!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: ‘समान काम समान वेतन’ या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे रोजंदारी कर्मचारी गत एक महिन्यापासून संपावर गेले असून, १६ दिवसांपासून कर्मचार्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यातील तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने मंगळवारी त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले.
कृषी विद्यापीठाच्या बाराही विभागाच्या रोजंदारी कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे शेतीची कामे ठप्प पडली आहेत. शास्त्रज्ञांना रात्रीची गस्त घालावी लागत आहे; पण संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. नवे कुलगुरू डॉ.व्ही.एम. भाले यांनी कर्मचार्यांना काही मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले आहे.
दरम्यान, उपोषणकर्त्या कुसुम देवानंद कांबळे तसेच काशीनाथ मेश्राम, रमेश चक्रे हे उपोषणाला बसले होते.
त्यांचा उपोषणाचा हा १६ दिवस होता. या उपोषणकर्त्यांंची प्रकृती खालावल्याने त्यांना सवरेपचारमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. त्यांच्या जागी नीळकंठ जवळकर व मारोती खिल्लारे हे मंगळवारपासून उपोषणाला बसले आहेत.