अकोल्यातील बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 02:00 AM2017-10-24T02:00:38+5:302017-10-24T02:05:44+5:30

अकोला: अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या नवजात  बालकांच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली आहे.  २0१६-१७ या वर्षात अकोल्यातील जिल्हा महिला रुग्णालयात  अनेक नवजात बालके दगावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

He asked for an answer in the case of child death in Akola | अकोल्यातील बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले

अकोल्यातील बालमृत्यूप्रकरणी उत्तर मागितले

Next
ठळक मुद्देमानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या नवजात  बालकांच्या मृत्यूप्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय मानवाधिकार  आयोगाने महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली आहे.  २0१६-१७ या वर्षात अकोल्यातील जिल्हा महिला रुग्णालयात  अनेक नवजात बालके दगावल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
मानवाधिकार आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस जारी  करून सहा आठवड्यांच्या आत उत्तर सादर करण्याचे निर्देश  दिले. ‘अकोला जिल्हा महिला रुग्णालयात झालेल्या अनेक  नवजात बालकांच्या मृत्यूबाबतच्या बातम्यांची आपण स्वत:हून  दखल घेतलेली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बालकांचा मृत्यू  होणे हे राज्य सरकार, रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित  विभागाच्या निष्काळजीपणाचे निदर्शक आहे. ही नवजात बालके  आणि त्यांच्या कुटुंबांच्या मानवाधिकाराचे गंभीर उल्लंघन  केल्यासारखेच आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने ठराविक  मुदतीत चौकशी करणे आवश्यक आहे,’ असे आयोगाने म्हटले  आहे. रुग्णालयाच्या विशेष  विभागात दर महिन्याला किमान  २५0 बालकांना भरती केले जाते आणि एवढय़ा मोठय़ा संख्येत  येणार्‍या बालकांची काळजी घेण्यासाठी आणखी कर्मचार्‍यांची  गरज आहे, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनीच  म्हटलेले आहे. हेही आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे  आयोगाने महाराष्ट्र सरकारकडे विस्तृत अहवाल सादर करण्यास  सांगितले आहे.

Web Title: He asked for an answer in the case of child death in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा