हटिया - पुणे व मालदा टाउन -सुरत विशेष रेल्वे गाड्या धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:33+5:302021-02-05T06:15:33+5:30

हटिया - पुणे गाडी क्रमांक- ०२८४९ अप हटिया-पुणे विशेष गाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार व सोमवारी ...

Hatia - Pune and Malda Town - Surat special trains will run | हटिया - पुणे व मालदा टाउन -सुरत विशेष रेल्वे गाड्या धावणार

हटिया - पुणे व मालदा टाउन -सुरत विशेष रेल्वे गाड्या धावणार

हटिया - पुणे

गाडी क्रमांक- ०२८४९ अप हटिया-पुणे विशेष गाडी ५ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार व सोमवारी हटिया स्थानकावरून रात्री ०८.०५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी पुणे स्टेशनला दुपारी ०२.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकात दर शनिवार व मंगळवारी दुपारी ०२.४२ वाजता येऊन ०२.४५ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

गाडी क्रमांक ०२८५० डाऊन पुणे -हटिया विशेष गाडी दिनांक ७ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवार व बुधवारला पुणे स्थानकातून सकाळी १०.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी हटिया स्टेशनला दुपारी १६.२५ वाजता पोहोचेल. ही गाडी अकोला स्थानकात दर सोमवार व गुरुवारी रात्री ९.४७ वाजता येऊन ९.५० वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

मालदा टाउन -सुरत

गाडी क्रमांक-०३४२५ अप मालदा टाउन -सुरत विशेष गाडी ६ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी मालदा टाउन स्थानकावरून दुपारी १२.३० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी सुरतला पहाटे ०४.०० वाजता पोहोचेल. ही गाडी रविवारी सायंकाळी ७.१० वाजता अकोला स्थानकावर येऊन ७.१५ वाजता पुढील प्रवासाठी रवाना होईल.

गाडी क्रमांक- ०३४२६ डाऊन सुरत-मालदा टाउन विशेष गाडी ८ फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी सुरतहून दुपारी ०२.२० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी मालदा टाउनला सकाळी ०६.१५ वाजता पोहोचेल. ही गाडी रात्री २०.३८ वाजता अकोला स्थानकावर येऊन २०.४० वाजता पुढील प्रवासाला रवाना होईल.

Web Title: Hatia - Pune and Malda Town - Surat special trains will run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.