तापमानाची हॅट्ट्रिक; सलग तिसऱ्या दिवशी अकोला विदर्भात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST2021-05-07T04:19:24+5:302021-05-07T04:19:24+5:30

एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून नागरिकांना ...

Hat trick of temperature; Akola tops Vidarbha for third day in a row | तापमानाची हॅट्ट्रिक; सलग तिसऱ्या दिवशी अकोला विदर्भात अव्वल

तापमानाची हॅट्ट्रिक; सलग तिसऱ्या दिवशी अकोला विदर्भात अव्वल

एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहे. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून नागरिकांना सुमारे ४३ अंशापेक्षा जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या जीवाची काहिली होत आहे. तर गुरुवारी देखील उष्णतेची तीव्रता कायम राहिली. सलग तीन दिवस जिल्ह्याचे तापमान विदर्भात सर्वाधिक नोंदविल्या गेले.

--बॉक्स--

मागील तीन दिवसांचे तापमान

३ मे ४१.६

४ मे ४२.८

५ मे ४३.४

--बॉक्स--

वाढत्या तापमानामुळे आजार बळावले!

जिल्ह्यात प्रचंड तापमानामुळे ताप, उलट्या, खोकल्यासारखे साथीचे आजार बळावले आहेत. विशेषत: लहान मुलांना वाढत्या तापमानाचा सामना करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

--बॉक्स--

ढगाळ वातावरणामुळे तापमानात बदल शक्य!

तापमान दिवसेंदिवस वाढत आहे; मात्र जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Web Title: Hat trick of temperature; Akola tops Vidarbha for third day in a row