हरिश पिंपळे कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:57 IST2021-01-08T04:57:01+5:302021-01-08T04:57:01+5:30

गत तीन दिवसांपासून घरातच असलेले आमदार हरिश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे होती. त्यांनी सर्तकता बाळगत येथील लक्ष्मीबाई देशमुख ...

Harish Pimple Corona Positive | हरिश पिंपळे कोरोना पॉझिटिव्ह

हरिश पिंपळे कोरोना पॉझिटिव्ह

गत तीन दिवसांपासून घरातच असलेले आमदार हरिश पिंपळे यांना कोरोना झाल्याची लक्षणे होती. त्यांनी सर्तकता बाळगत येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात तातडीने रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचणी करून घेतली. यामध्ये त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. पुढील उपचारासाठी त्यांनी अकोला सर्वोपचार रुग्णालय गाठले असून, डाक्टरांच्या सल्ल्याने विविध चाचण्या करून उपाय करणार असल्याचे त्यांनी ''लोकमत''शी बोलताना सांगितले. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

----------------------------------------

अनेकजण संपर्कात आमदार हरिश पिंपळे यांच्या अनेकजण संपर्कात आल्याची माहिती आहे. त्यांच्या नित्याने संपर्कात येणारे स्वीय सहायक, कार्यालयीन कर्मचारी, कार्यकर्ते व परिवारातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता बळावली आहे. त्यांच्या नजीकच्या संपर्कातील सर्वच व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घेतली असून, त्यांचे अहवाल दोन दिवसांत प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Web Title: Harish Pimple Corona Positive