वाढदिवसाला आलेल्या मित्रांनीच केली मारहाण

By Admin | Updated: July 3, 2017 02:06 IST2017-07-03T02:06:39+5:302017-07-03T02:06:39+5:30

अकोला : किरकोळ वादातून युवकाला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री कैलास टेकडी येथे घडली.

Happy birthday friends only | वाढदिवसाला आलेल्या मित्रांनीच केली मारहाण

वाढदिवसाला आलेल्या मित्रांनीच केली मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : किरकोळ वादातून युवकाला त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मित्रांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री कैलास टेकडी येथे घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
कैलास टेकडी परिसरात राहणारा अंकुश गणपतराव पाटील (२१) याने दिलेल्या तक्रारीनुसार १ जुलै रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे मित्र चरण ठाकूर, प्रताप सराटे व विक्की ठोसर हे त्याच्या घरी आले.
मित्रांनी बाहेर वाढदिवस साजरा करू, असे त्याला सांगून बाहेर आणले. चौघेही सिंधी कॅम्प शाळेत आल्यावर अंकुश पाटील व त्याच्या मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादात तिघाही मित्रांनी अंकुशला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याला वीट फेकून मारली. यामध्ये अंकुश जखमी झाला. अंकुश पाटील याच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंवि कलम ३२४ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: Happy birthday friends only