वाढदिवस जल्लोषात; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:38+5:302021-05-12T04:19:38+5:30

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस फटाके फोडत तसेच संचारबंदीचे उल्लंघन करीत मोठ्या उत्साहात साजरा ...

Happy Birthday; Crimes against eight to ten people | वाढदिवस जल्लोषात; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

वाढदिवस जल्लोषात; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

Next

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस फटाके फोडत तसेच संचारबंदीचे उल्लंघन करीत मोठ्या उत्साहात साजरा करणाऱ्या भीम नगरातील आठ ते दहा जणांविरुद्ध डाबकी रोड पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या भीमनगर येथे आकाशातील फटाके फोडत व मोठा केक कापून प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. संचारबंदी नियमांचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून या ठिकाणी वाढदिवसाला मोठा केकही कापण्यात आला. या जल्लोषाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डाबकी रोड पोलिसांनी वाढदिवस आयोजित करणाऱ्यांसह सहभागी असणार्‍यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

कलम २६९, १८८ अनवये गुन्हा

वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी जमवून साथरोग वाढीस कारणीभूत ठरणे तसेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ठाणेदार नाॅट रिचेबल

डाबकी रोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय नाफडे यांना यासंदर्भात माहिती विचारण्यासाठी वारंवार संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शहरात संचारबंदी कायदा लागू असतानाही एका ठाणेदाराला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील नागरिकांनी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना फोन केले; मात्र प्रतिसाद न दिल्याने ठाणेदाराला याचे काहीही सोयरसुतक नसल्याची चर्चा आहे.

दंगलीवर नियंत्रण नव्हते

डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुलझारपुरा येथे दोन गटात तुफान हाणामारी होऊन दंगल झाली होती. यावेळी ठाणेदारांना माहिती नसल्याची चर्चा आहे. यावरून डाबकी रोडचे ठाणेदार या परिसरात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात अपयशी असल्याची चर्चा नागरिक करीत आहे.

Web Title: Happy Birthday; Crimes against eight to ten people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app