एलबीटी रिटर्न सादर करण्यात हात आखडता

By Admin | Updated: July 11, 2014 01:26 IST2014-07-11T00:29:56+5:302014-07-11T01:26:17+5:30

केवळ दोन हजार व्यावसायिकांचे विवरण जमा

Handwriting of LBT Return | एलबीटी रिटर्न सादर करण्यात हात आखडता

एलबीटी रिटर्न सादर करण्यात हात आखडता

अकोला: महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर जमा करणार्‍या नोंदणीधारक उद्योजक, व्यावसायिकांनी एलबीटीचे पुनर्मूल्यांकन करीत ३0 जूनपर्यंत ह्यविवरणह्ण (रिटर्न) सादर करणे क्रमप्राप्त होते. आजपर्यंत ५ हजार ३६१ नोंदणीधारक व्यावसायिकांपैकी अवघ्या दोन हजार व्यावसायिकांनी मनपाकडे रिटर्न सादर केले. उशिरा रिटर्न सादर करणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत प्रशासनाने दिले आहेत.
महापालिका क्षेत्रात ६ सप्टेंबर २0१३ पासून जकातऐवजी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) लागू करण्यात आला. स्थानिक संस्था कर जमा करणार्‍या संबंधित व्यापारी, उद्योजक यांनी वर्षभरात आयात केलेल्या सर्व मालाचे मूल्य १ लाख रुपयांपेक्षा कमी नसणे गरजेचे असून, वर्षभरात त्यांच्या विक्रीची अथवा खरेदीची उलाढाल ही ५ लाख रुपयांपेक्षा कमी नसणे आवश्यक आहे.
या दोन अटींची पूर्तता करणार्‍या व्यापार्‍यांनी एलबीटीसाठी नोंदणी करणे क्रमप्राप्त आहे. महापालिका प्रशासनाकडे व्हॅटधारकांसह ५ हजार ३६१ व्यावसायिकांची नोंदणी आहे. प्रशासनाने ७ सप्टेंबर ते ३१ मार्चपर्यंतचे एलबीटीच्या पुनर्मूल्यांकनाला सुरुवात केली. त्यानुसार एलबीटीची नोंदणी केलेल्या व्यावसायिकांना नोटीस देण्यात आल्या.
व्यावसायिकांनी ३0 जूनपर्यंत ३१ मार्चपर्यंंतच्या व्यवहाराची (रिटर्न) माहिती मनपाकडे सादर करणे भाग होते. आजपर्यंत केवळ २ हजार व्यावसायिकांनी विवरण सादर केले. उर्वरित व्यावसायिकांनी अद्यापही विवरण सादर न केल्याने प्रशासन दंडात्मक कारवाई करणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: Handwriting of LBT Return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.