स्वयंसेवी संस्थांचा आखडता हात

By Admin | Updated: July 13, 2014 21:36 IST2014-07-13T20:03:34+5:302014-07-13T21:36:11+5:30

सौंदर्यीकरणासाठी ‘ग्रीन अकोला, क्लीन अकोला’ संकल्पना सादर केली.

Hands on NGOs | स्वयंसेवी संस्थांचा आखडता हात

स्वयंसेवी संस्थांचा आखडता हात

अकोला : मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी 'ग्रीन अकोला, क्लीन अकोला' संकल्पना सादर केली. मध्यंतरी काही स्वयंसेवी संस्थांनी बैठकीत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्पदेखील केला. मनपाकडे २३ हजार वृक्ष पडून असताना, लागवडीसाठी अनेकांनी आखडता हात घेतला. त्यामुळे 'ग्रीन अकोला' संकल्पनेला तडा जाण्याची शक्यता असल्याने अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ व निर्माणाधीन इमारतींच्या बांधकामाचा परिणाम वृक्षांवर होत आहे. शहरातील सार्वजनिक जागा तसेच लेआऊटमधील खुल्या जागांवर अनधिकृत बांधकाम होत असल्याने मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. संपूर्ण शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने जल प्रदूषणासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला. जळगाव,अमरावती व नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणात वृक्ष लागवडीमुळे भर पडली आहे. शिवाय हवेच्या प्रदूषणाला काही अंशी आळा बसला आहे. त्याच धर्तीवर मनपा आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी ह्यग्रीन अकोला क्लीन अकोलाह्ण संकल्पना अकोलेकरांसमोर ठेवली. शहर विकासाची दूरदृष्टी ठेवणार्‍या अधिकार्‍यांना अकोलेकरांच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता आहे. मध्यंतरी अनेक स्वयंसेवी संस्थांनी शहराच्या विकासात ह्यखारीह्णचा वाटा उचलण्याची हमी देत, वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. प्रशासनाने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, तूर्तास २३ हजार वृक्ष जमा झाले आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर निस्वार्थ भावनेने वृक्ष दिल्याची माहिती आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी मनपाकडे तेवढय़ा प्रमाणात ट्रिगार्ड उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. शिवाय, वृक्ष लागवड करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनीच आखडता हात घेतला. ही बाब लक्षात घेता, प्रशासनाने स्वत:च वृक्ष लागवडीला १२ जुलैपासून सुरुवात केली आहे.

** सुविधा हव्यात, दायित्वाचा विसर

सुंदर बगिचा, प्रशस्त व स्वच्छ रस्ते, पथदिवे, स्वच्छ पाणीपुरवठा, वॉकिंग ट्रॅक, पदपाथसह अतिक्रमणमुक्त अकोला सर्वांना हवे आहे. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपावर ढकलल्या जाते; परंतु एक अकोलेकर या नात्याने आपले कर्तव्य व दायित्व काय, यावर कोणीही विचार करीत नाही. मनपाच्या सामाजिक उपक्रमात नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे. तरच खर्‍या अर्थाने अकोला ह्यग्रीनह्ण होईल.

Web Title: Hands on NGOs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.