ट्रेनमधून पडलेल्या तरुणासाठी ‘इंटरसिटी’ची अर्धा किमी उलटी धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2016 16:24 IST2016-08-20T14:11:26+5:302016-08-20T16:24:46+5:30

ट्रेनमधून खाली पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी नरखेड-काचिगुडा इंटरसिटी एक्स्प्रेस अर्धा किमी मागे धावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे

Half a kilometer vomit in Intercity for the young man who was on the train | ट्रेनमधून पडलेल्या तरुणासाठी ‘इंटरसिटी’ची अर्धा किमी उलटी धाव

ट्रेनमधून पडलेल्या तरुणासाठी ‘इंटरसिटी’ची अर्धा किमी उलटी धाव

>- ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. 20 - ट्रेनमधून खाली पडलेल्या तरुणाला वाचवण्यासाठी ट्रेनला अर्धा किमी मागे नेण्यात आलं. आनंदराव मडकापूरे असं या तरुणाचं नाव असून वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
आनंदराव मडकापूरे हा तरुण नरखेड-काचिगुडा इंटरसिटी एक्स्प्रेसने  प्रवास करत होता. अकोला रेल्वेस्थानकावरून सकाळी ९.२0 वाजता ही ट्रेन निघाली होती. बार्शिटकळी-लोहगड दरम्यान तो ट्रेनमधून खाली पडला. त्यानंतर त्याच्या मदतीसाठी ही गाडी अर्धा किमी मागे धावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आनंदराव मडकापूरे हा नांदेड जिल्ह्यातील मुदखेडचा रहिवासी असल्याची माहिती रेल्वे पोलीस संतोष घोगे यांनी ‘लोकमत’ला दिली. त्याच्यावर वाशिम येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Web Title: Half a kilometer vomit in Intercity for the young man who was on the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.