आधी शहराचा विकास हवा; मगच हद्दवाढ करा!
By Admin | Updated: January 28, 2016 00:42 IST2016-01-28T00:42:40+5:302016-01-28T00:42:40+5:30
‘लोकमत परिचर्चे’त उमटला सूर; ग्रामस्थांना सहन करावा लागेल कराचा भुर्दंड.

आधी शहराचा विकास हवा; मगच हद्दवाढ करा!
अकोला: महानगरपालिकेची प्रस्तावित हद्दवाढ करण्यात यावी; मात्र आधी शहराचा विकास करावा, मगच शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत सोमवारी उमटला.अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव असून, यामध्ये शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश प्रस्तावित आहे. शहरालगतच्या गावांमध्ये रस्ते, पाणी व इतर मूलभूत सुविधांसह गावांच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय शहरालगतच्या गावांचा विकास होणार नाही. त्यामुळे शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्यास गावांचा विकास होणार असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विचार यावेळी मांडण्यात आला. तथापि, महानगरपालिका अस्तिवात आल्यापासून शहराचाच पाहिजे तसा विकास झाला नाही. आधी शहराचा विकास करण्यात यावा; नंतर शहरानजीकच्या गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, अशी भूमिका परिचर्चेत सहभागी बहुतांश वक्त्यांनी मांडली. मनपाची हद्दवाढ झाल्यास शहरानजीकच्या गावांमधील ग्रामस्थांना नाहक कराचा भुर्दंंड सहन करावा लागेल. ग्रामीण भागात विकासाच्या योजना राबविण्यात येत असून, हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात २१ गावे समाविष्ट केल्यास या गावांचा विकास होणार की नाही, याबाबत खात्री नाही. शहराचा विकास नाही, तर हद्दवाढ करून गावांचा समावेश कसा होईल.धी शहराचा विकास करण्यात यावा, नंतर शहराची हद्दवाढ करण्यात यावी, असा विचार मांडण्यात आला.