बारावीचे १५ कॉपीबहाद्दर निलंबित

By Admin | Updated: March 7, 2017 02:28 IST2017-03-07T02:28:23+5:302017-03-07T02:28:23+5:30

शिक्षण विभागाने विविध परीक्षा केंद्रांवर १५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना निलंबित केले.

Half of the 15th copy of the suspension | बारावीचे १५ कॉपीबहाद्दर निलंबित

बारावीचे १५ कॉपीबहाद्दर निलंबित

अकोला, दि. ६- इयत्ता बारावीच्या गणित, सांख्यिकी विषयाच्या परीक्षेदरम्यान सोमवारी शिक्षण विभागाने विविध परीक्षा केंद्रांवर १५ विद्यार्थ्यांना कॉपी करताना निलंबित केले. बाळापूर तालुक्यातील गायगाव येथील सर्मथ कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर १0 विद्यार्थी कॉपी करताना सापडल्याने त्यांना निलंबित करण्यात आले. तसेच तेल्हारा तालुक्यातील अडगाव येथील डॉ. जगन्नाथ ढोणे विज्ञान व कला महाविद्यालय परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांना कॉपी करताना निलंबित करण्यात आले. पातूर येथील तुळसाबाई कावल कनिष्ठ महाविद्यालय येथे एक विद्यार्थी निलंबित केला. यासोबतच डॉ. एच.एन. सिन्हा कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर एका कॉपीबहाद्दराला शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने निलंबित केले.

Web Title: Half of the 15th copy of the suspension