शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

गारपिटीचा तडाखा : अकोला जिल्हय़ातील २७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:50 AM

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

ठळक मुद्देजिल्हय़ातील पाच तालुक्यांत १८५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसलेल्या जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यातील सातपैकी पाच तालुक्यतिं १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी गारपीटग्रस्त २ हजार ७३९ शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.गत ११ फेब्रुवारी रोजी जिल्हय़ातील सातही तालुक्यांत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. अवकाळी पाऊस व गारपिटीने विविध गावांत हरभरा, गहू या रब्बी पिकांसह संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या पिकांचे नुकसान झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने हिसकावला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करून १७ फेब्रुवारीपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला होता. त्यानुषंगाने तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीने झालेल्या  पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात आले असून, पीक नुकसानाचे अहवाल तहसीलदारांमार्फत १९ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, पातूर व तेल्हारा या पाच तालुक्यांमध्ये २ हजार ७३९ शेतकर्‍यांचे १ हजार ८५७ हेक्टर २0 आर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामध्ये हरभरा, गहू, संत्रा, लिंबू, केळी ही फळपिके आणि कांदा व इतर भाजीपाला पिकांच्या नुकसानाचा समावेश आहे.  ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पिकांचे नुकसान झालेले गारपीटग्रस्त शेतकरी मदतीसाठी पात्र ठरले आहेत.

शासनाकडे आज  अहवाल पाठविणार !अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामध्ये गारपीटग्रस्त शेतकरी आणि ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसानाचे क्षेत्र इत्यादी माहितीचा समावेश आहे.

दोन तालुक्यांत नुकसानच नाही! अवकाळी पाऊस व गारपिटीने ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पीक नुकसानाचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये जिल्ह्यातील बाश्रीटाकळी व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ३३ टक्क्यांपेक्षा जास्त पीक नुकसान निरंक दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या दोन तालुक्यांत पिकांचे नुकसानच नाही. तसेच तेल्हारा तालुक्यात केवळ एका शेतकर्‍यांचे पीक नुकसान झाले आहे.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणFarmerशेतकरी