आकोटात गुटख्याचा साठा जप्त!
By Admin | Updated: July 20, 2016 01:43 IST2016-07-20T01:43:32+5:302016-07-20T01:43:32+5:30
गोरखधंद्याचा लोकमतने वृत्तमालिकेद्वारे पर्दाफाश केल्यानंतर मंगळवारी आकोटात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला.

आकोटात गुटख्याचा साठा जप्त!
अकोला: जिल्हय़ातील गुटखा माफियांनी छुप्या मार्गाने गुटख्याची वाहतूक करून खुलेआम गुटखा विक्री सुरूअसल्याच्या गोरखधंद्याचा लोकमतने वृत्तमालिकेद्वारे पर्दाफाश केल्यानंतर मंगळवारी आकोटात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. आकोट पोलिसांनी ही कारवाई केल्यानंतर सदरचा प्रतिबंधित गुटख्याचा साठा अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या ताब्यात देण्यात आला आहे. आकोट येथील हनुमान नगरमध्ये रवी तुकाराम नालट याच्या घरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती आकोट पोलिसांना मिळाली. यावरून आकोट पोलिसांनी हनुमान नगरमध्ये छापेमारी करून नालट याच्या घरातील गुटख्याचा साठा जप्त केला आहे. यामध्ये विमल गुटखा, सितार गुटखा, गोवा, पान बहार, काली बहारसह विविध प्रकारचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. यासोबतच सुगंधित सुपारीही जप्त करण्यात आली असून नालट याला ताब्यात घेण्यात आले आहे. आकोट पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला आहे; मात्र आकोला पोलीस व अन्न आणि औषधी प्रशासन विभागाकडून अद्यापही झोपेत आहे. भाजी बाजारातून सर्रास गुटखा विक्री करण्यात येत असताना याकडे डोळेझाक केल्या जात असल्याची माहिती आहे. ह्यलोकमतह्णच्या वृत्तमालिकेनंतर अकोल्यातील गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून त्यांनी गुटख्याच्या साठय़ाची विल्हेवाट लावणे सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. रेल्वेने आणला जातो गुटख्याचा साठा मध्यप्रदेशातून गुटख्याचा मोठा साठा रोज रेल्वेने आकोट येथे आणण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा गुटख्याचा साठा अडगाव बु. रेल्वे स्टेशन, वान रेल्वे स्टेशन, पाटसुल आणि आकोट रेल्वे स्टेशनवर उतरविण्यात येत असून त्यानंतर छोट्या चारचाकी ट्रकने या गुटख्याची वाहतूक केल्या जात आहे. अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात याच परिसरातून गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.