हिवरखेड, मुंडगाव येथील किराणा दुकानातून गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:19 IST2021-02-16T04:19:40+5:302021-02-16T04:19:40+5:30

दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड लोहारी व मुंडगाव येथे किराणा दुकानातून गुटख्याची ...

Gutkha stocks seized from grocery shop at Hivarkhed, Mundgaon | हिवरखेड, मुंडगाव येथील किराणा दुकानातून गुटख्याचा साठा जप्त

हिवरखेड, मुंडगाव येथील किराणा दुकानातून गुटख्याचा साठा जप्त

दहशतवाद विरोधी कक्षाची कारवाई

अकोला : हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरखेड लोहारी व मुंडगाव येथे किराणा दुकानातून गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून दहशतवाद विरोधी कक्षाने रविवारी रात्री उशिरा छापा टाकून चार जणांकडून ५० हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे.

मुंडगाव येथील नीलेश माणिकराव मसने यांच्या किराणा दुकानातून गुटखा विक्री सुरू होती त्यासोबतच लोहारा येथील शिवराम रूपराव डिक्कर हिवरखेड येथील विजय रसिकलाल खिलाया व बरकत खान मुर्तजा खान या चाैघांच्या किराणा दुकानांतून राज्यात प्रतिबंध इन असलेल्या गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती तसेच विरोधी पक्षाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली या माहितीवरून त्यांनी पथकासह सापळा रचून रविवारी रात्री उशिरा छापेमारी केली या चारही किराणा दुकानांतून ५० हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख विलास पाटील यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात केली.

बडे माफिया मोकाट; छोट्यांवर कारवाई

शहरासह जिल्हाभरात बडे गुटखा माफिया मोकाट आहेत; मात्र संबंधित विभागाकडून केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई सुरू आहे. यामुळे या कारवाया संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

Web Title: Gutkha stocks seized from grocery shop at Hivarkhed, Mundgaon