किराणा बाजारातून गुटख्याचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST2021-03-22T04:17:20+5:302021-03-22T04:17:20+5:30

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या किराणा बाजारात दोन गुटखा माफिया त्यांच्या पान मसाल्याच्या दुकानातून गुटख्याची ...

Gutkha stocks seized from grocery market | किराणा बाजारातून गुटख्याचा साठा जप्त

किराणा बाजारातून गुटख्याचा साठा जप्त

अकोला : सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुन्या किराणा बाजारात दोन गुटखा माफिया त्यांच्या पान मसाल्याच्या दुकानातून गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे.

रजपुतपुरा येथील रहिवासी अक्षय चमन अग्रवाल व युवराज घनश्याम अग्रवाल या दोन गुटखा माफियांचे जुन्या किराणा बाजारात पान मसाल्याचे दुकान असून या दुकानातून दोघेही जिल्हाभरातील दुकानदारांना मोठ्या प्रमाणात गुटख्याची विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकून दोन्ही अग्रवाल गुटखा माफियांच्या दुकानातून सुमारे ६० हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी गुटखा माफियांविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Gutkha stocks seized from grocery market