आकोटात अडीच लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: January 8, 2015 00:42 IST2015-01-08T00:42:54+5:302015-01-08T00:42:54+5:30
मालवाहू ऑटोमधून २ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा जप्त.

आकोटात अडीच लाखांचा गुटखा जप्त
आकोट : आकोट-अंजनगाव मार्गावर पोलिसांची नाकाबंदी असताना वाहन तपासात आंबोडी वेस परिसरात मालवाहू ऑटोमधून २ लाख ७२ हजार रुपयांचा गुटखा आकोट शहर पोलिसांनी मंगळवारी जप्त केला आहे.
पोलीस सूत्रानुसार, अकोला येथून आकोट मार्गे अंजनगावकडे जाणार्या एमएच ३0 एबी ५३७ क्रमांकाच्या मालवाहू ऑटोमधून तब्बल २ लाख ७२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा मिळून आला.
पोलिसांनी ऑटोसह चालक अ. अजीज अ. रज्जाक रा. एकता चौक, अकोला याला ताब्यात घेतले. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाला कळविण्यात आले. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी रावसाहेब वाकडे यांचे तक्रारीवरून भादंवि कलम २७३, ३२८, १८८ व अन्न व सुरक्षा मानदे कायदा २0६ अंतर्गत कलम ५९(३) अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सदर कारवाई एपीआय नितीन पाटील व एनपीसी जितेंद्र कातखेडे यांनी केली. यापूर्वीसुद्धा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी आकोटात साडेपाच लाख रुपयांच्या गुटखा जप्तीची कारवाई केली होती.