अकोट शहरातून तीन लाखांचा गुटखा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:16 IST2021-04-19T04:16:56+5:302021-04-19T04:16:56+5:30
अकोला : अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्पमध्ये एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षकांच्या ...

अकोट शहरातून तीन लाखांचा गुटखा जप्त
अकोला : अकोट शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॅम्पमध्ये एका घरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा असल्याच्या माहितीवरून पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. या घरातून सुमारे तीन लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
अकोट शहरातील सिंधी कॅम्प येथील रहिवासी रवी रतनलाल जाधवाणी (वय ३० वर्ष) याच्या राहत्या घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. या माहितीवरून त्यांनी पथकासह छापा टाकून रवी जाधवानी याच्या घरातून विमल, काली बहार, नीली बहार, सिमरन, उडण गरम, पान बहार, वाह यासह विविध कंपनीचा गुटखा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी रवी जाधवाणी याच्याविरुद्ध अकोट शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.