जप्तीतील ४५ लाखांचा गुटखा जाळला

By Admin | Updated: November 19, 2014 02:11 IST2014-11-19T02:11:44+5:302014-11-19T02:11:44+5:30

अकोला येथील अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाही.

Gutka burned for 45 lakhs of seizure | जप्तीतील ४५ लाखांचा गुटखा जाळला

जप्तीतील ४५ लाखांचा गुटखा जाळला

अकोला - अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस प्रशासन आणि महापालिकेचा एलबीटी पथक यांनी विविध ठिकाणी छापे घालून जप्त केलेला तब्बल ४५ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी जाळण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांसोबतच पोलिस प्रशासन व एमआयडीसी अधिकार्‍यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये फेज क्रमांक ४ मध्ये हा गुटखा जाळण्यात आला.
राज्यात २0१३ पासून गुटखाबंदी केली आहे. गत दोन वर्षांपासून लागू असलेल्या गुटखाबंदीनंतरही मध्य प्रदेश व हैद्राबादमधून मोठय़ा प्रमाणात गुटखा आणला जातो. बंदीच्या काळात अव्वाच्या सव्वा किंमत लावून गुटखा माफियांनी कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. गुटखाबंदी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने माफियांवर नजर ठेवून गुटखा जप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
तथापि, तोकड्या कर्मचारी वर्गामुळे त्यांना मोठय़ा प्रमाणात छापे घालून गुटखा जप्त करणे शक्य नव्हते. त्यामुळे पोलिस प्रशासन व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई केली. अश विविध छाप्यांदरम्यान जप्त केलेला सुमारे ४५ लाख रुपयांचा गुटखा मंगळवारी जाळण्यात आला.
गुटख्याचा हा माल गत अनेक दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात होता. मंगळवारी आवश्यक बाबींची पूर्तता केल्यानंतर त्याला आगीच्या स्वाधीन करण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शरद कोलते, अन्न निरीक्षक नितीन नवलकार, प्रशांत अजिंठेकर, रावसाहेब वाकडे, राजेश यादव यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

 

Web Title: Gutka burned for 45 lakhs of seizure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.