शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने गुरू पौर्णिमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:13 IST2021-07-24T04:13:17+5:302021-07-24T04:13:17+5:30

शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने खंडेलवाल लॉन येथे शुक्रवारी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम गुरू गोरक्षनाथांच्या ...

Guru Pournima on behalf of Shivtej Pratishthan | शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने गुरू पौर्णिमा

शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने गुरू पौर्णिमा

शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने खंडेलवाल लॉन येथे शुक्रवारी गुरू पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी ते बोलत होते. सर्वप्रथम गुरू गोरक्षनाथांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. योगगुरू मनोहरराव इंगळे व अनुराधा इंगळे यांचा यथोचित सत्कार याप्रसंगी करण्यात आला. बाळासाहेब काळे, प्रा. सत्यनारायण बाहेती, घनश्याम गांधी, मोनिका बालचंदानी, पुष्पा गांधी यांनी निरनिराळी उदाहरणे व कवितेतून गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. योगगुरूंनी कोरोनाकाळातसुद्धा दररोज ऑनलाइन योगवर्ग सुरू ठेवून सर्व साधकांचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम ठेवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमात साधक राजेश गोमासे यांची पीएसआयपदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामप्रकाश मिश्रा, जसवंतसिंग मल्ली, मुकेश खंडेलवाल, रेवलनाथ जाधव, शिवतेज इंगळे, अनुराधा इंगळे, वंदना तायडे, गणेश भांडे यांनी प्रयत्न केले. प्रास्ताविक डॉ. गोविंद जाधव यांनी केले. आभार पुरुषोत्तम गुप्ता यांनी मानले.

Web Title: Guru Pournima on behalf of Shivtej Pratishthan