बंदूक साफ करताना गोळी सुटली
By Admin | Updated: January 28, 2015 00:02 IST2015-01-28T00:02:26+5:302015-01-28T00:02:26+5:30
बुलडाणा येथील स्टेट बँक शाखेतील घटना; सुदैवाने जखमी नाही.

बंदूक साफ करताना गोळी सुटली
बुलडाणा : येथील स्टेट बँक शाखेत बंदुक साफ करताना गोळी सुटल्याची घटना आज २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. विविध कामानिमित्त स्टेट बँकेत रोजच गर्दी असते; मात्र आज सकाळी बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर एका खोलीतून बंदुकीतील गोळी झाडल्याचा आवाज झाला, त्यामुळे काही वेळ खळबळ उडाली. दरम्यान, बँकेचे व्यवस्थापक चक्रे यांनी आवाज येणार्या खोलीत गेले असता सुरक्षा गार्ड नंदू मोकाशी यांनी बंदूक साफ करताना एक राऊंड फायर झाल्याचे सांगितले. यावेळी कोणीही जखमी झाले नाही. याबाबत बँक व्यवस्थापक चंक्रे यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे.