शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी व्हावे - गुलाबराव गावंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:31 IST

अकोला : शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्‍चिम विदर्भातील लाखो शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.

ठळक मुद्देप्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांचे आवाहन१२ डिसेंबर रोजी धडकणार मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शेतकर्‍यांच्या मुळावर उठलेल्या राज्य सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वात १२ डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर आयोजित हल्लाबोल मोर्चात अकोला जिल्हय़ासह पश्‍चिम विदर्भातील लाखो शेतकर्‍यांसह जनतेने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.राज्यात भाजपाचे सरकार येताच शेतकरी देशोधडीला लागला असून, त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. या सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. या सर्व अडचणी आणि शेतकर्‍यांच्या विविध समस्या तसेच प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे १ डिसेंबरपासून यवतमाळ येथून हल्लाबोल आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनामध्ये खा. सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांच्यासह माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व नेते सहभागी झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मनातील खदखद बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना व्यासपीठ निर्माण करून दिले असून, यामध्ये शेतकर्‍यांचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. या आंदोलनात पहिल्या दिवसापासून विदर्भातील शेतकर्‍यांचे नेते तथा सावकारविरोधी कायद्याचे प्रणेते माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी पदयात्रेत चांगलाच जोश निर्माण केला असून, शेतकर्‍यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे. शेतकर्‍यांना योग्यरीत्या मार्गदर्शन करीत त्यांनी सभा गाजविणे सुरू केले आहे. शेतकर्‍यांना न्याय मिळावे, त्यांचे प्रश्न या सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी शरद पवार स्वत: या हल्लाबोल आंदोलनात सहभागी होणार असून, या मोर्चात पश्‍चिम विदर्भातील तमाम शेतकरी व कार्यकर्त्यांनी लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Gulabrao Gavandeगुलाबराव गावंडेNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीagitationआंदोलन