अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनचालकांना दिले गुलाब पुष्प!
By Admin | Updated: July 20, 2016 01:41 IST2016-07-20T01:41:18+5:302016-07-20T01:41:18+5:30
अकोला येथील रेल्वे सुरक्षा दल तसेच जीआरपी पोलिसांचा अभिनव प्रयोग.

अनधिकृत पार्किंग करणा-या वाहनचालकांना दिले गुलाब पुष्प!
अकोला : रेल्वे स्टेशन परिसरात मनमानी वाहने उभी करणार्या वाहनचालकांचे गुलाबाचे फूल देऊन रेल्वे सुरक्षा दल तसेच जीआरपी पोलिसांनी स्वागत केले. तसेच पुन्हा अशा पद्धतीने पाकिर्ंग करू नका, अशी हात जोडून विनंती करत गांधीगिरीचे प्रदर्शन केले. अकोला रेल्वे स्थानकाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात पाकिर्ंगची समस्या निर्माण झाली आहे. वाहनधारकांना शिस्त लावण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही यश येत नसल्याने अखेर आरपीएफ व जीआरपी पोलिसांनी गांधीगिरीचा मार्ग पत्करला. स्टेशन अधीक्षक मनोजकुमार पिल्ले, पोलीस निरीक्षक राजेश बडे, आर. टी. वानखडे आदींचा सहभाग होता.